पिंपरी – रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी हिसकावले. ही घटना सोमवारी (दि. 28) काळेवाडी मधील अमरदीप कॉलनी येथे दुपारी एकच्या सुमारास घडली. याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दुचाकीवरील अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला आपल्या मैत्रिणीसोबत सोमवारी दुपारी एकच्या सुमारास काळेवाडी मधील अमरदीप कॉलनी मधून जात होत्या. त्यावेळी अचानक दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील 20 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले. महिलेने आरडा-ओरडा करण्याअगोदर दुचाकीस्वार तिथून पसार झाले. यावरून महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)