मंगळसूत्रासाठी विवाहितेचा खून

पिंपरी – माहेरुन मंगळसूत्र घेऊन ये असे सांगत सासरच्या माणसांनी चटके देत केलेल्या छळामुळे विवाहितेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात पती, सासू व सासरे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोनिका सोमनाथ जाधव (वय-31, रा. चिंचोली, देहुगाव) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती सोमनाथ नारायण जाधव, सासू लक्ष्मीबाई नारायण जाधव, सासरे नारायण तुकाराम जाधव, दीर गणेश नारायण जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दीर व सासरे यांना देहुरोड पोलिसांनी अटक केले आहे. तर पती व सासू हे फरार आहेत. या प्रकरणी मोनिका यांच्या आई शांता रमेश पवार यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिका यांचा हा दुसरा विवाह होता. त्यांच्या पहिल्या पतीचा मृत्यू झाल्याने त्यांनी 2015 मध्ये सोमनाथ यांच्याशी विवाह केला. पहिल्या पतीने जे तुला मंगळसूत्र घातले होते ते घेऊन ये म्हणून पती व सासरच्या माणसांनी मोनिका यांना मारहाण केली तसेच त्यांना उपाशी ठेवले. अत्याचाराची परिसिमा म्हणून त्यांना चटकेही देण्यात आले होते.

देहुरोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी सुरुवातील छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र मोनिका याचा औंध रुग्णालयात उपचारा दरम्यान 13 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. यावेळी रुग्णालयाने दिलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार मोनिका यांचा मृत्यू “सेमिया ड्यू टू मल्टीपबल बर्न इंज्युरी’ म्हणजेच त्यांना दिलेल्या चटक्‍यामुळे झाल्याचे उघड झाले आहे. पहिली दिलेली तक्रार व शवविच्छेदन अहवालानुसार देहुरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दिपाली बोरकर तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)