मंगळवार तळ्यासाठी नकारच

गणेश विसर्जनासाठी तीन तळ्यांचा प्रस्ताव
सातारा- सातारा शहरात कळीचा मुद्दा ठरलेल्या श्री विसर्जनासाठी मंगळवार तळ्यासाठी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी स्पष्ट नकार दिला. ज्या मंडळाच्या मूर्ती बारा फुटापेक्षा जास्त उंच आहेत त्या मंडळांना सातारा – मेढा रस्त्यावरील कण्हेरची खाण,गोडोली तळ्याचा पर्याय देण्यात आला आहे. तर घरगुती गणेश विसर्जनासाठी भवानी जलतरण तलावाचा पर्याय देण्यात आला आहे.

अवघ्या पंधरा मिनिटाच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी विसर्जन मिरवणुकीचा प्रश्न निकाली काढला. यावेळी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, नगराध्यक्ष माधवी कदम, मुख्याधिकारी शंकर गोरे, तसेच गणेश मंडळ अध्यक्षांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची सायंकाळी सव्वाचार वाजता श्री विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने अध्यक्ष चर्चा करायला गेले होते. सिंघल यांनी अगदीच मोजक्‍या सूचनांमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली.

मंगळवार तळयाच्या संदर्भात पुन्हा आग्रह करण्याचा प्रयत्न झाला मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयाला नकार दिला. घरगुती गणपतीसाठी भवानी तलाव व इतर सार्वजनिक गणपतीसाठी कण्हेरची खाण व गोडोली तळ्याचा पर्याय दिल्याचे स्पष्ट केले. त्याच आदेशाचा पुनरूच्चार पंकज देशमुख यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केला. या दोन्ही बैठकांमधूनही मंडळ कार्यकत्त्यांचे समाधान झाले नाही. या संदर्भात पालिका मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मंगळवार तळ्याला नकार मिळाल्याच्या माहिती ला दुजोरा दिला.

आम्ही प्रशासनाच्या आदेशाचे पालन करणार गोडोली तळ्यावर पायाड, लाईट तसेच क्रेन व इतर अनुषांगिक सुविधांची कामे सुरु करणार असल्याचे गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)