उच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे सुनावणी; सातारकराकडून निर्णयाचे स्वागत
सातारा, 
गेल्या एक महिन्यापासून श्री आगमनाच्या आदीच त्यांच्या विसर्जनाचा सुरू असलेला कायदेशीर खैंदूळ सोमवारी संपुष्टात आला. पालिकेच्या पुनर्विचार याचिकेवर उच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीत मंगळवार तळे हे राजघराण्याच्या मालकीचे आहे, त्याचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्था व लोकप्रतिनिधी यांनी त्यांच्या पातळीवर घ्यावयाचा आहे, अशी स्पष्ट सुचना न्यायालयाक डून झाल्याने मंगळवार तळ्यात श्री विसर्जनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या सुनावणी संदर्भात कोर्टाकडून निकाल घेण्याच्या द्रविडी प्राणायमासंदर्भात खुद्द न्यायालयाने आश्‍चर्य व्यक्‍त केले. मंगळवार तळ्याला एका अर्थाने हिरवा कंदील मिळाला असून सातारकरांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. आणि जीव टांगणीला लागलेल्या सातारा पालिकेनेही सुटकेचा निश्‍वास टाकला आहे.
सातारा पालिकेने मंगळवार तळ्यात करावयाच्या विसर्जनाच्या मुद्दयावर पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र या याचिकेवर दहा तारखेला सुनावणी घेण्याचे न्यायालयाने निर्देशित केले होते. त्या पार्श्‍वभुमीवर उच्च न्यायालयाच्या पाटील, केतकर खंडपीठापुढे सुनावणी झाली. या सुनावणीसाठी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे, नगर पालिका प्रकल्प संचालक रवी गोरे, पालिकेतर्फे ऍड. प्रप्फुल्ल शहा व मुळ याचिकाकरते सुशांत मोरे उपस्थित होते. या याचिकेवर पंधरा मिनिटात सुनावणी आटोपण्यात आली. मंगळवार तळे हे राजघराण्याच्या मालकीचे आहे या तळ्यात विसर्जन कधीच क रू नये असे कधीही निर्देश देण्यात आले नव्हते, उलट पक्षी सातारा पालिकेने या संदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. तळ्यात विसर्जनाचा विषय हा स्थानिक स्वराज्य संस्था व लोकप्रतिनिधी यांच्या अखत्यारितील आहे. पर्यावरणाचे निकष पाळून या विषयावर योग्य तो निर्णय त्यांनी घ्यावा, असे कोर्टान सुचित केले. तसेच अशाप्रकारच्या याचिकांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेने थेट कोर्टात यावे या विषयी मुख्याधिकाऱ्यांना कानपिचक्‍या देण्यात आल्या. गेल्या एक महिन्यापासून मंगळवार तळे विसर्जनाचा मुद्दा प्रचंड राजकीय हेलकावे घेत होता. त्याला कोर्टाच्या निर्देशनामुळे पुर्णविराम मिळाला आहे. या निर्णयाचे साताऱ्यात उत्स्फूर्त स्वागत झाले. मात्र पालिका वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू होत्या. काही संकेतस्थळांवर साताऱ्यात विसर्जनाचा पेच वाढला अशा बातम्या झळकू लागल्या. कोर्टाने मुख्याधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. अशी पुस्ती जोडण्यात आली होती. मात्र मुख्याधिकारी शंकर गोरे व पालिकेचे वकिल ऍड. प्रप्फुल्ल शहा यांनी मंगळवार तळ्याच्या परवानगीवर शिक्‍कामोर्तब केले.
प्रशासन व पोलिस अधिकाऱ्यांच्यावतीनेही म्हणणे सादर करण्यात आले.

विसर्जनाचा बागुलबूवा उभे करणारे पडले तोंडावर
साताराऱ्यात श्री गणेशाचे आगमनापेक्षा, विसर्जनाचीच अधिक चर्चा यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभुमीवर काही उलटया काळजाच्या विघ्नसंतोषी व्यक्‍तींकडून जाणिवपूर्वक होत होती. परंतु मा.उच्य न्यायालयाने, आजच मंगळवारतळे येथे विसर्जनास परवानगी देण्याबाबत सकारात्मक निर्णय दिल्याने, विसर्जन प्रश्‍नाचा भयानक बागुलबुवा उभा करणारेच स्वतः तोंडावर पडून, त्यांचे दात घशात गेले आहेत. मे.उच्य न्यायालायाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो अशी मार्मिक प्रतिक्रीया सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
विसर्जनाच्या प्रश्‍नाविषयी पालिकेला गांभिर्य नाही, आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न खासदारांकडून होत आहे. विसर्जनास मंगळवारतळे उपलब्ध झाले नाही तर गणेश भक्‍तांच्या रोष ओढावेल., अश्‍या प्रकारचे बेताल वक्‍तव्य करुन, आमच्यावर आणि साविआवर अकारण तोंडसुख घेण्याचा प्रकार काही व्यक्‍तीकडून जाणुन बुजुन सुरु होता असा टोला उदयनराजे यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)