मंगळवारी जिल्हास्तरीय युवा महोत्सव

सातारा – जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे सातारा येथील शाहू कला मंदिर येथे मंगळवार, दि. 11 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी दिली आहे.
या युवा महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, एकांकीका (इंग्रजी/हिंदी), शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य, सितार, बासरी, तबला, विणा, मृदंग, हार्मोनियम (लाईट), गीटार, मणिपुरी नृत्य, ओडीसी नृत्य, भरतनाट्यम, कथ्थ्क, कुचीपुडी नृत्य, वकृत्व हिंदी/इंग्रजी या कला प्रकाराचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयातील शिक्षण घेणारे, शिक्षण पूर्ण झालेले, कला अध्यापन, विद्यार्थी, नाट्य मंडळातील कलाकार या सर्वांसाठी हे कलामंच खुले आहे.

या महोत्सवातील कला प्रकारासाठी प्रवेश विनामुल्य असून प्राविण्य संपादन करणारे कलाकारांना शासनाचे प्रमाणत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तरी प्रवेश निश्‍चीतीसाठी दि.10 डिसेंबर 2018 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात प्रवेश अर्ज करावा, असे आवाहनही जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)