मंगळवारपासून व्हेरॉक करंडक स्पर्धा

थेरगाव – पीसीएमसीज व्हेरॉक-वेंगसकर क्रिकेट अकादमीमार्फत 13 वर्षाखालील मुलांसाठी 1 ते 4 मे दरम्यान व्हेरॉक करंडक क्रिकेट स्पर्धा होणार आहे.

अंतिम सामना 4 तारखेला होणार आहे. सर्व सामने थेरगाव येथील व्हेरॉक-वेंगसकर अकादमीच्या मैदानावर होतील. स्पर्धेत आठ निमंत्रित संघ सहभागी होणार आहेत. व्हेरॉक वेंगसकर क्रिकेट अकादमी अ, ब, चिंतामणी निम्हण अकादमी, पुष्प क्रिकेट अकादमी, पीवायसी, डेक्कन जिमखाना, द क्रिकेटर्स क्‍लब, क्‍लब ऑफ महाराष्ट्र या संघाचा त्यामध्ये समावेश आहे.

सुरूवातीस साखळी सामने होणार असून, गुणानुक्रमे पहिल्या चार संघामध्ये उपांत्य फेरीचे सामने होतील. प्रत्येक सामना 25 षटकांचा असेल. स्पर्धेचे पारितोषिक वितरण भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसकर यांच्या हस्ते होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)