मंगल कार्यालयातून साडे चार लाखांचे दागिने चोरी

वाकड (वार्ताहर) – थेरगाव येथील एका मंगल कार्यालयामधून दोन महिलांचे चार लाख 40 हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी पळवले. ही घटना 21 एप्रिल रोजी सायंकाळी सहा ते रात्री दहाच्या दरम्यान घडली. या प्रकरणी वर्षा सरमाने यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार थेरगाव येथील कैलास मंगल कार्यालयाच्या वरपक्षाच्या रुममध्ये फिर्यादी आणि त्यांच्या बहिणीने एका कापडाच्या बॅगमध्ये सोन्याचे दागिने ठेवले होते. त्यांची नजर चुकवून चोरट्याने 4 लाख 40 हजार रुपये किंमतीचे दागिने ठेवलेले बॅग चोरुन नेली. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक डी.के.आढाव पुढील तपास करत आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)