मंगल कार्यालयातील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

संग्रहित फोटो

नवनीत कांबळे

दागिने चोरीच्या घटनेत होतेय वाढ : सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची आवश्‍यकता

पुणे – सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणची मंगल कार्यालये बुक झालेली असतात. ऐन लग्नसोहळ्या दिवशी पै-पाहुण्यांची आनंदात रेलचेल सुरू असते. यातील कोणते पाहुणे कुणाकडून आहेत? हेच बऱ्याचदा अनेकांना समजून येत नाही. यांसह अनेक बाबींचा गैरफायदा घेत मंगल कार्यालयात चोरीच्या घटना घडतात. काहीवेळा वधूचे दागिने चोरीला गेल्याचे समजते. तर काहीवेळा पैशाची बॅग लंपास होते. यात हजारापासून लाखो रूपयांचा ऐवज लंपास होतो. या घटनेमुळे अनेकांना मानसिक धक्‍का बसतो. यामुळे काही मंगल कार्यालयातील सुरक्षा यंत्रणेचा प्रश्‍न ऐरणीवर येतो.

याबाबत यवत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर. ए. यादव यांनी सांगितले की, शहरापेक्षा ग्रामीण भागात महामार्ग, चौक, बसस्थानक अशा मोक्‍याच्या ठिकाणी अधिक प्रमाणात मंगल कार्यालये आहेत. अश कार्यालय, लॉन आदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना मंगल कार्यालयाच्या मालकांना पोलिसांकडून देण्यात येत असतात. तसेच त्यांना जागोजागी सूचना लावण्याचेही सांगण्यात आलेले आहे. मात्र, काही कार्यालये सूचनांचे पालन करतात तर काही दुर्लंक्ष यामुळे चोरीच्या घटनेत वाढ होत आहेत. मागील आठवड्यात एक चोरीची घटना मंगल कार्यालयात घडली आहे. यवत पोलीस ठाण्याच्या हद्‌दी सुमारे 7 ते 8 मंगल कार्यालये आहेत. केडगावात साधारणत: तीन ते चार, तर चौफुलामध्ये दोन कार्यालये आहेत. या कार्यालयांनाही सुरक्षा यंत्रणा सक्षम करण्याचे पोलिसांनी सूचविण्यात आले आहे. तरीही यातील काही कार्यालयात चोरीच्या घटना घडत आहेत. काहीवेळा गर्दीचा फायदा घेऊन मौल्यवान वस्तू पळविल्या जातात. तर, काही वेळा अनोळखी व्यक्‍ती ओळखीची असल्याचे भासवून दागिन्यांवर डल्ला मारते. अशा अनेक प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

सुरक्षारक्षकाची गरज
वधू-वर असो की पाहुणे यांच्या दागिन्यांवर चोर डल्ला मारतात. आतापर्यंत केडगाव-चौफुलासारख्या परिसरात दोन महिन्यात चारवेळा चोरीची घटना लग्नसराईत घडल्या आहेत. यातील घटना अधिक करून मंगल कार्यालयात घडल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे मंगल कार्यालयातील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे मंगल कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची आवश्‍यकता असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

अशी आखली जाते योजना
काहीवेळा चोरटे हे मंगल कार्यालयात पाहुणे म्हणून जातात आणि वधू-वर यांचे कक्ष कोणत्या ठिकाणी आहे. तसेच कोणत्या ठिकाणी बॅग ठेवलेल्या आहेत. यांसह इतर माहिती काढतात. तसेच त्यातील काही लोकांना भेटून “आम्ही यांच्याकडील पाहुणे’ असल्याचे सांगून ओळख काढतात. अन्‌ त्यातून विश्‍वास संपादन करून चोरी करतात, असेही काही घटनांमधून समोर आले आहेत.

दोन महिन्यात चार चोऱ्या
दौंड तालुक्‍यातील यवत, केडगाव-चौफुला परिसरात अनेक मंगल कार्यालय, सभागृह, लॉन आदी आहेत. तसेच या गावांजवळून पुणे-सोलापूर महामार्ग गेला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कार्यालये ही महामार्गाशेजारी आहेत. यातील काही मंगल कार्यालयात दोन महिन्यात चार चोरीच्या घटना घडल्या आहेत. यात लाखो रूपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. त्यामुळे मंगल सोहळ्यादिवशीच अशा घटना घडल्यामुळे अनेक वर्षभराची कमाई काही बाबींकडे दुर्लंक्ष केल्यामुळे जात असल्याने मानसिक धक्‍का बसत आहे.

नागरिकांनी विवाह सोहळ्यादिवशी मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. तसेच त्या वस्तू अनोळखी व्यक्‍तीकडे देऊ नयेत. गर्दीत जाताना मौल्यवान वस्तूंकडे लक्ष ठेवावे. तसेच कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे तसच सुरक्षा यंत्रणा सक्षम आहे की नाही? याची खात्री करावी. तसेच कार्यालय मालकांनीही सुरक्षायंत्रणेत अधिक कार्यक्षम करण्यावर भर देणे गरजेचे आहे.
– आर. ए. यादव, पोलीस उपनिरीक्षक, यवत पोलीस ठाणे.

आम्ही आमच्या कार्यालयात चोरीसह कोणत्याही घटना घडू नयेत म्हणून मुख्य प्रवेशव्दार, वधू-वर कक्ष, भोजन व्यवस्था आदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. तसेच पोलिसांच्याही सूचनांचे पालनही केले जात आहे. त्यामुळे आमच्या कार्यालयात चोरीच्या घटना घडल्या नाहीत. तसेच वडील पोलीस खात्यात होते. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी आम्ही योग्य ती खबरदारी घेतली आहे.
– महेश रुपनवर, मालक, कृष्णाई मंगल कार्यालय, केडगाव.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)