मंगलगेट चौकीसमोरून मोटारसायकल चोरी

नगर – माहेश्‍वरी मंगल कार्यालय, मंगलगेट चौकीसमोरून मोटारसायकल चोरल्याची घटना घडली आहे.

संजय नारायणदास लोढा (वय-55, रा. दाळमंडई, मर्चंट बॅंकेसमोर, अ. नगर) यांचा मुलगा सुमित सतीश लोढा हा येथील एका दवाखान्यात उपचार घेण्यासाठी गेलेला असताना अज्ञात चोराने 50 हजार रुपये किमतीची होंडा ऍक्‍टिव्हा कंपनीची (एमएच-16 बीएक्‍स-0121) मोटारसायकल चोरून नेल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चौकीसमोर मोटारसायकल चोरीस गेल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये दिवसभर पोलीस चौकीविषयीच गप्पा रंगत होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)