‘मंकी बात’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

लहान मुलं म्हटलं की किलबिल, धम्माल मस्ती, दंगा असे माकडचाळे ओघाने आले, त्या शिवाय कोणाचेही बालपण पूर्ण होत नाही. मात्र अलीकडे इंटरनेटच्या आभासी जाळ्यात मुले अडकत चालली आहेत. यामुळेच काही वर्षापूर्वी पर्यंत लहान मुलांच्या शाळानां सुट्टया लागल्या की बालनाट्य, चिमणराव आणि गुंड्याभाऊ, चार्ली चॅप्लिन, लॉरेल अँड हार्डी, चंपक, मोगली अशा पात्रांची मुलांना भुरळ पडलेली असायची ती आता दिसत नाही. या गोष्टींची उणीव लक्षात घेऊन त्यावर आधारित ‘मंकी बात’ चित्रपट तयार करण्यात आला आहे.

Monkey Baat | Motion Poster | Marathi Movie

१८ मे पासून माकडचाळे सुरू…. घेऊन आलोय 'मंकीबात' च फंकी मोशन पोस्टरबोला बजरंग बली की जय !! ?#MotionPoster #MonkeyBaat #18MayPresented By : Aakash Anand Pendharkar & Vinod SatavDirected By : @Viju ManeProduced By: #NishthaProductions & #VijuMane

Posted by Monkey Baat on Sunday, 15 April 2018

-Ads-

डार्विनचा सिद्धांत उलटा होणार, माणसाचं पुन्हा माकड होणार. अशी हटके पंचलाईन असलेल्या मोशन पोस्टरमुळे ‘मंकी बात’ बद्दल सर्वांच्याच मनात उत्कंठा निर्माण झाली आहे. या चित्रपटाचे महत्वाचे वैशिष्ट म्हणजे लहान मुलांनीच लहान मुलांसाठी हा चित्रपट तयार केला आहे. हा बालचित्रपट येत्या १८ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)