भ्रष्ट नेते आणि अधिकाऱ्यांना तुरुंगाचीच हवा : इम्रान खान 

इस्लामाबाद (पाकिस्तान): भ्रष्ट नेते आणि अधिकारी यांना आता तुरुंगाचीच हवा खावी लागणार आहे, असा सज्जड इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला आहे. देशाला कर्जाच्या खाईत लोटणाऱ्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना एनआरओ (नॅशनल रिकन्सिलिएशन ऑर्डनन्स) सारख्या कोणत्याही कायद्याचा आधार मिळणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
इम्रान खान बुधवारी पाकिस्तानी जनतेशी संवाद साधत होते. सन 2007 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती जनरल मुशर्रफ यांनी एनआरओ कायदा लागू केला होता. या कायद्याने राजकारणी लोकांवरचे सर्व खटले काढून टाकण्यात आले होते. मात्र दोन वर्षांनी, सन 2009 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा कायदा रद्दबातल केला होता.
आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला त्यातून बाहेर काढण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती इम्रान खान जनतेला देत होते. देशाला 30 लाख कोटी रुपयांच्या कर्जात बुडवणाऱ्या पूर्वीच्या सरकारांवर त्यांनी कडाडून हल्ला केला. बनावट बॅंक खात्यांमध्ये मोठमोठ्या रकमांच्या उलाढाली होत आहेत. हा पैसा कोठून आला?, तर तो देशाला लुबाडूनच आलेला आहे. भ्रष्टाचाराची पाळेमुळे उखडून काढल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही, असे स्पष्ट करून भ्रष्ट नेते आणि अधिकारी यांना एनआरओसारख्या कोणत्याही कायद्याचा आधार मिळणार नाही, तर त्यांना तुरुंग़ाचीच हवा खावी लागणार असल्याचे त्यांनी सुनावले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)