भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या परदेशवारीचे वांधे !!!

नवी दिल्ली – भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार यापुढे ज्या सरकारी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप आहे अथवा भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल आहेत अशा अधिकाऱ्यांना पासपोर्ट मिळणार नाहीये.

ज्या सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचारप्रकरणी तपास सुरू असेल किंवा त्यात तो दोषी आढळला तर अशा अधिकाऱ्यांना पासपोर्ट देण्यात येणार नाही. सरकारने पासपोर्टसाठी सुधारित अधिसूचना जारी केल्या आहेत. यात भ्रष्ट अधिकाऱ्यांना पासपोर्ट न देण्याची तरतूद करण्यात आली असून, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची प्राथमिक यादी पासपोर्ट कार्यालयाकडे ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

1 COMMENT

  1. वरील वृत्त वाचण्यात आले हाच न्याय भ्रष्ट राजकारण्यां बाबत का असू नये ? वेळोवेळी प्रत्येक पक्षातील गुन्हेगार असलेले लोकप्रतिनिधी गुन्हे दाखल झालेले, न्यायालयात अशांच्या विरोधात चालू असलेले खटले ह्यांच्या नावानिशी सविस्तर माहिती वाचावयास मिळते अशा लोकप्रतिनिधींना वरील कायद्यातून सूट देण्यात आली आहे का ? ह्याचा सविस्तर खुलासा होणे गरजेचे नाही का ? तसे असेल तर भ्रश्टाचाराची आता स्वतंत्र व्यख्या असणे गरजेचे वाटते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)