भ्रष्टाचार विरोधी चळवळीला राजकीय पक्षाचे स्वरूप देणे अयोग्य : एच. एस. फुलका

नवी दिल्ली: भ्रष्टाचाराच्या विरोधात सुरू झालेल्या चळवळीला राजकीय पक्षाचे स्वरूप देण्याचा प्रकार आम आदमी पक्षाच्या बाबतीत घडला आहे. हा प्रकार पुर्णपणे अयोग्य होता असे मत या पक्षातून नुकतेच बाहेर पडलेले नेते ऍडव्होकेट एच. एस. फुलका यांनी व्यक्‍त केले आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की अण्णा हजारे यांनी सन 2012 मध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात अत्यंत सक्षम चळवळ उभी केली होती तशीच चळवळ पुन्हा उभी करण्याची गरज आहे. या चळवळीला राजकीय पक्षात रूपांतर करण्याचा प्रयोग आम आदमी पक्षाकडून झाला. पण त्यातील फोलपणा लक्षात आल्यानंतर अनेकांनी आता त्यातून काढता पाय घेतला आहे असे ते म्हणाले.

फुलका यांनी आम आदमी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय गुरूवारी जाहीर केला पण त्याचे कारण मात्र त्यांनी अजून दिलेले नाही. त्यांच्या राजीनाम्या विषयी बोलताना आम आदमी पक्षाचे नेते खासदार संजयसिंह यांनी सांगीतले की, त्यांनी त्यांचे पक्षाविषयीचे मत का बदलेले याची आपल्याला कल्पना नाही. ते म्हणाले की लोकपाल विधेयक संसदेत संमत करून घ्यायचे असेल तर संसदेत आपले राजकीय प्रतिनिधी पाठवण्याची गरज आहे त्यासाठी आम आदमी पक्षाची स्थापना करण्यात आली होती त्या संकल्पनेला फुलका यांचा सुरूवातीला पाठिंबा होता पण आता जर त्यांनी आपली भूमिका बदलली असेल तर त्याला मी काहीही करू शकत नाही असे खासदार संजयसिंह यांनी नमूद केले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)