भ्रष्टाचार, रोजगाराच्या प्रश्नांना मोदी घाबरतात – राहुल गांधी

जयपूर – भ्रष्टाचार, रोजगार आणि राफेल प्रश्नांवर बोलताना मोदी नजरेला नजर भिडवण्यास घाबरतात. त्यामुळेच राफेल व्यवहारात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होउनही पंतप्रधान या महत्वपूर्ण बाबींवर गप्प आहेत, असा निशाणा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी साधला.

जयपूरमध्ये कॉंग्रेसच्या प्रतिनिधी संमेलनात ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले, युपीए सरकारच्या काळात सरकारने एक विमान 540 कोटी रुपयांत विकत घेतले होते. मात्र, सध्या भाजपा सरकारने त्याच एका विमानाच्या खरेदीसाठी फ्रान्सच्या कंपनीला 1600 कोटी रुपये दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हा मोठा घोटाळा असून पंतप्रधान या प्रकरणावर भाष्य करायला तयार नाहीत. पंतप्रधानांनी 2 कोटी रोजगार, प्रत्येकाच्या बॅंक खात्यात 15 लाख रुपये तसेच महिलांच्या सुरक्षेचे आश्वासन दिले होते. त्याअनुशंगाने मी लोकसभेत जेव्हा राफेल व्यवहार, शेतकऱ्यांचा मुद्दा, तरुणांना रोजगार, बलात्काराच्या सातत्याने होत असलेल्या घटना यावर प्रश्न उपस्थित केले तर मोदी माझ्या नजरेला नजर भिडवू शकत नव्हते.

शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांना खोटी आश्वासने दिली गेली. गेल्या 2 वर्षांत मोदी सरकारने 15 उद्योगपतींचे 2 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. मात्र, आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर पंतप्रधान मोदींच्या तोंडून एकही शब्द निघताना दिसत नाही.

बेटी बचाओ, बेटी पढाओची घोषणा त्यांनी दिली. मात्र, तिला कोणापासून वाचवायचे हे सांगितले नाही. उत्तर प्रदेशात भाजपाचाच एक आमदार बलात्कार करतो. मात्र, पंतप्रधान यावर काहीही बोलत नाहीत. उत्तर प्रदेश पासून छत्तीसगढपर्यंत सगळीकडे हीच स्थिती आहे, असे राहुल गांधी म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)