भ्रष्टाचार मुक्त भारताचे काय झाले?; अण्णा हजारे यांचा मोदी सरकारला सवाल

नवी दिल्ली – मोदी सरकारने सत्तेवर येताना देश भ्रष्टाचार मुक्त करू असे आश्‍वासन दिले होते पण गेल्या चार वर्षात भ्रष्टाचार मुक्ती तर झाली नाहीच पण भ्रष्टाचारात पुर्वी पेक्षाही आणखी वाढ झाली आहे असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. अण्णांचे दिल्लीत लोकपाल व शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषण सुरू झाले असून या बेमुदत उपोषणाचा आजचा तिसरा दिवस होता.

उपोषण स्थळी कार्यकर्त्यांनां संबोधिक करताना अण्णांनी हा विषय उपस्थित केला. भ्रष्टाचार निर्मुलनाचे मोदी सरकारचे आश्‍वासन हवेत विरले आहे असा दावाहीं अण्णांनी केला आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारत आता अशियात पहिल्या स्थानावर गेला असल्याच्या माहितीकडेही त्यांनी लक्ष वेधले.

दरम्यान आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी अण्णांचे वजन तीन किलोंने घटले आहे. त्यांच्या समवेत अन्यही काही कार्यकर्ते बेमुदत उपोषणाला बसले आहेत त्यांच्यापैकी एकाची प्रकृती आज बिघडल्याने त्याला रूग्णालयात हलवण्यात आले आहे. आपल्या मागण्यांवर आपण ठाम असून जो पर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत आपले उपोषण सुरूच राहील असेही अण्णांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान अण्णांशी सरकारच्या वतीने चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील मंत्री गिरीश महाजन यांना दिल्लीत पाचारण करण्यात आले आहे. तथापी केंद्र सरकारने मात्र त्यांच्या आंदोलनाकडे अजूनपर्यंत लक्षच दिलेले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

2 COMMENTS

  1. वरील वृत्त वाचण्यात आले ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल म्हणाले होते India was never a Nation, it became a nation only under British Rule.भारत स्वांतत्र्याचा जाई ठराव ब्रिटिश पार्लमेंट मध्ये मंडल गेला होता त्यावर भाषण करताना चर्चिल म्हणाले होते भारताला स्वात्यंत्र देऊ नका आजचे भारतीय नेते गेल्यावर, भारतात जे हरामखोर बदमाश नेतृत्व उदयास येईल ते आपल्या देशाला बाजारात आणून स्वात्यंत्रयाची वाट लावून टाकतील चर्चिल हे कोणी भविष्य वर्तविणारे नव्हते पण बारतीयांची मानसिकता ह्याची पूर्ण कल्पना असल्यानेच त्यांचे वरील शब्द 100% खरे होत असल्याचे आपण वेळोवेळी अनुभवीत आहोत दुसरा मुद्धा म्हणजे गेल्या भारत चीन युद्धात चिनी लक्क्षराने एकतर्फी युद्धबंदी जाहीर करून माघार घेतली त्यावेळी एका जपानी वार्ताहाराने माओ तेस तुंगला चिनी लष्कर भारतीय लष्कराला घाबरून माघारी गेले काय ?म्हणून प्रश्न केला तेव्हा माओ म्हणाला भारत जिंकणे हा केवळ एक दिवसाचा सवाल आहे कारण ज्याला विकत घेता येत नाही असा एकही नेता भारतात उरलेला नाही

  2. श्री आणा हजारे ह्यांना मी वृत्तपत्राद्वारे त्यांनी हे असे उपोषण करण्याचे प्रकार बंद करू स्वच्छच चरित्राचे व चरित्राचे देशातून ५०० सर्वांगीण यॊग्य उमेदवार निवडून त्यांना स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यास उभे करावे व प्रत्येक निवडणुकीत मतदारांनी ह्याच व्यक्तींना मतदान करण्याचे आवाहन करावे असे पुण्यातील समस्त वृत्त पितरांना कळविले होते पण एकाही वृत्तपत्राने ह्याची दखल घेतली नाही पत्रकारिता जर लोकशाहीचा चवथा आधारस्तंभ समजला जातो तर ते तरी आपली जबाबदारी यॊग्य व गंभीर पणे पाळत असल्याचे पाहावयास मिळते का ? तेव्हा खरी लोकशाही चे मूळ ह्या देशात फोपविणारच नसेल तर भारत हा भ्रस्ताचारीच राहणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)