भ्रष्टाचारातून आता कोणाचीही सुटका नाही; पंतप्रधानांचा भ्रष्टाचाऱ्यांना इशारा

नवी दिल्ली – सरकारने भ्रष्टाचाराच्या विरोधात सुरू केलेल्या लढाईमुळे आता कोणाचीही सुटका नाही असे नमूद करतानाच आता श्रीमंत आणि शक्तीशाली लोकही यातून सुटू शकत नाहीत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. लालप्रसाद यादव यांनी झालेल्या कारावासाच्या शिक्षेच्या पार्श्‍वभूमीवर आज राष्ट्रीय छात्र सेनेच्या एक रॅलीत बोलताना त्यांनी हे विधान केले.

ते म्हणाले की यापुर्वी सामान्य लोकांचा असा समज होता की सत्तेवर असलेले भ्रष्टाचारी लोक सहज सुटतात. आणि आपल्यावरील कारवाई ते टाळू शकतात पण आता तशी स्थिती राहिलेली नाही. आज देशातील तीन माजी मुख्यमंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारागृहात बंदिस्त आहेत. भ्रष्टाचाराच्या विरोधातील आपली लढाई यापुढेही सुरूच राहील त्यात कोणाचीही गय केली जाणार नाही असे त्यांनी यावेळी नमूद केले.

भ्रष्टाचार आणि काळ्यापैशाच्या विरोधातील ही लढाई म्हणजे देशातील युवकांच्या उज्जवल भवितव्यासाठीची लढाई आहे. देशातील युवक भ्रष्टाचाराच्या विरोधातील आहेत असे ते म्हणाले. एनसीसीच्या छात्रांना आणि देशातील युवकांना त्यांनी यावेळी डिजीटल व्यवहारावर भर देण्याचे आवाहन केले. भ्रष्टाचार निर्मुलनासाठी हा एक प्रभावी मार्ग असल्याचे ते म्हणाले. या व्यवहारासाठी सरकारने सुरू केलेल्या भीम ऍपचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्यासाठी अन्य लोकांनाहीं उद्युक्त करा असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)