भोसे येथे सेवा सहकारी संस्थेत रंगले कवी संमेलन

वाकी-मरता….मरता डोळे भरून पहावं, मयताला कोण….कोण आलंय…मला बांबूवर उचलून नेणारे… मयताच्या टाळूवरील लोणी खाणारे माझे भाऊबंध… माझ्या दहाव्याची वाट पहात उंबऱ्याशी बसून होते. कवितेतील अखेरची ओळ अशी उद्धृत केलेली की, डोळे मिटून घ्यावेत, रक्तातील माणसांपेक्षा घेणेकरीच सगळे गोळा झाले. या कवितेतील ओळीने रसिक सुन्न झाले.
निमित्त होते भोसे (ता. खेड) येथे आयोजित केलेल्या कवी संमेलनाचे. कष्टकरी, शोषित, सर्व वर्गाचे दुःख व्यतीत करणारी विविध कलाकारांची कविता, “तर जगी जपणे कठीण आहे, हे खेळ भावनांचे, आश्वासनात संकेत आहे, भय वाटे बलात्काराचे’ ही हाळी देणारे कवी एस. आर. भोगाडे यांच्या कवितेने नकळत रसिकांच्या डोळ्यातील आसवांना वाट मोकळी करून दिली. ग्रामीण भागात कवितेपासून कोसो दूर असलेल्या शेतकरी बांधवांसाठी भोसे (ता. खेड) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष सर्जेराव लोणारी यांनी प्रबोधनाचा एक भाग म्हणून या कवी संमेलनाचे आयोजन केले होते. पहाडी आवाजात कष्टकरी वर्गासाठी गायली गेलेली कविता यावेळी चांगलीच गाजली. भोगाडे यांच्या सुरेल सुरांनी नटलेल्या कवितेने रसिकांच्या मनाचा अक्षरशः ठाव घेतला. ग्रामस्थांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी ज्ञानेश्वर वाडेकर, सोसायटीचे चेअरमन सर्जेराव लोणारी, संचालक तानाजी कुटे, दादाराव कुटे, अजित ओव्हाळ, सुरेश कुटे, माऊली कुटे, किसन गांडेकर आदींसह शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)