भोसे येथे भैरवनाथ महाराज उत्सवात तरुणाई चिंब

चाकण-भोसे (ता. खेड) येथे भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्रींच्या पालखी छबिना मिरवणुकीत तरुण कार्यकर्त्यांचा यंदा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. त्यात हरिनामाचा जयघोष भक्तिरसात चिंब झालेली तरुणाई पाहून भोसे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. भव्य निकाली कुस्त्यांचा आखाड्यात भोसे केसरी चांदीची गदा मल्ल नांदेड महापौर केसरी मुक्तेश्वर मगनाळे याने पटकाविली. आणि चांदीची गदा व रुपये 33, 333 रोख रक्कमेचा इनाम उत्सव समितीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

भोसे येथील मल्ल पैलवान नंदकुमार सखाराम लोणारी व विरोधी मल्ल आर्यन पाटील यांच्यात झालेल्या अटीतटीच्या निकाली कुस्तीच्या लढतीत ढाक डावावर पैलवान नंदकुमार लोणारी याने विरोधी मल्लास चितपट केल्याने कुस्ती शौकीनांनी व भोसे ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या निकाली कुस्त्यांचा आनंद उपस्थितांना मिळाला. तेरा वयोगटातील सिद्धेगव्हाणच्या मल्ल ज्ञानेश्वरी संतोष साबळे व प्रीती पुरी यांची झालेली निकाली कुस्ती नेत्रदिपक ठरली. पैलवान ज्ञानेश्वरी साबळे व पुरी यांच्यात झालेल्या निकाली कुस्तीच्या लढतीत एकमेकींनी डाव व प्रतिडाव टाकला. ही कुस्ती बरोबरीने सोडविण्यात आली. आयोजित कुस्त्यांचा भव्य आखाड्यात राज्यभरातील दिडशे नामवंत कुस्तीगीर सहभागी झाले होते. एकूण भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेले धार्मिक कार्यक्रम तर मनोरंजनासाठी ठेवण्यात आलेला प्रकाश अहिरेकर यांचा लोकनाट्य तमाशा व झकास ऑर्केष्ट्रा या कार्यक्रमात बेधुंद झालेल्या लावणी नृत्याने रसिकांच्या काळजाचा ठोका चुकत होता. भैरवनाथ उत्सव कमिटीत यंदा तरुण कार्यकर्त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असल्याने व त्यांनी आयोजित कार्यक्रमांचे योग्य नियोजन केल्यामुळे भोसे गावचा उत्सव शांततेत पार पडला.

उत्सव समितीचे अध्यक्ष पैलवान सुरेश कुटे, मुचकुंद जाधव, चेअरमन सर्जेराव लोणारी, लाला अर्बन बॅंकेचे संचालक नितीन लोणारी, वसंत सोनबा लोणारी, दादाराव कुटे, तानाजी कुटे आदींनी तरुण कार्यकर्त्यांच्या कौतुकास्पद कार्याची प्रशंसा केली. भैरवनाथ उत्सवानिमित्त आयोजित केलेले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे पदाधिकारी यामध्ये पै. सुरेश बाबुराव कुटे, उपाध्यक्ष प्रशांत सुरेश कुटे, दत्तराज सयाजी गुंडगळ, खजिनदार मयूर मल्हारी कुटे, आशिर्वाद अरुण हलगे, पंकज शिवाजी कुटे, गोरख वसंतराव लोणारी, पै. रमेश नामदेव वाडेकर, पै. अनिल प्रभाकर कुटे, पै. विशाल अशोक पिंगळे, सयाजी गुणाजी कुटे, वसंतराव सोनबा लोणारी आदी कार्यकर्त्यांनी चोख नियोजन केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)