भोसले आखाड्यात मतदारांना पैसे वाटणाऱ्याविरोधात कारवाई 

नगर – भोसले आखाडा येथील काळेगल्लीत मतदारांना आर्थिक प्रलोभन देण्याच्या संशयावरून निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने एकाला ताब्यात घेतले आहे. उदय प्रकाश भोसले (वय 40, रा. भोसले आखाडा) याच्याकडून 37 हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. मंडलाधिकारी राजेंद्र आंधळे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी प्राजीत नायर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील हे प्रभाग क्रमांक 14 मधील भोसले आखाड्यावर गस्त घालत होते. आचारसंहिता भंग कोणी करत नाही ना, याची तपासणी करत होते. नायर व पाटील यांना पाहून उदय भोसले हा संशयास्पद हालचाली करू लागला. यामुळे नायर यांचा संशय बळावला. प्रत्यक्ष चौकशी केल्यावर उदय भोसले हा मतदारांना प्रलोभन देण्यासाठी पैशाचे वाटप करत होता. यानंतर नायर व पाटील या दोघांनी त्याला ताब्यात घेत विचारपूस केली.

दरम्यान, पाटील यांनी भरारी पथक पाचमधील प्राप्तीकर विभागातील अधिकारी आनंद वर्मा व युवराज नाईकयांना घटनास्थळी बोलावले. पथकातील कर्मचारी अनिल आढाव, संजय घोरपडे, एस. एन. सय्यद यांनी प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर अंगझडती घेतली. त्यावेळी उदय भोसले याच्या खिशात 37 हजार रुपये आढळले. यात दोन हजार रुपयाच्या 17, तर पाचशे रुपयाच्या सहा नोटा अंगझडती आढळून आल्या. या नोटांचे विवरण याचा तपशील घेऊन अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. या नोटा सीलबंद पाकिटामध्ये ठेवून पुढील तपासासाठी देण्यात आल्या आहेत. कोतवाली पोलीस ठाण्यात मंडलाधिकारी राजेंद्र आंधळे यांच्या फिर्यादीवरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

…वाजले की बारा! 
उदय भोसले हा नेमका कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, याची परिसरात कारवाईनंतर चर्चा रंगली आहे. याबाबत उलटसुटल चर्चा होत आहे. समजूतदार मतदारांनी मात्र या कारवाईचे स्वागत केले आहे. जे कोणी पैसे वाढत असले, त्याचा मात्र “वाजले की बारा’, असे म्हणत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)