भोसले आखाडा परिसरात सिलाई मशिन प्रशिक्षण केंद्र

नगर – “”महिलांना घरबसल्या स्वयंरोजगार निर्माण व्हावा, तसेच महिलांमध्ये विविध कलागुण असतात; त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी भोसले आखाडा परिसरात सिलाई मशिन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी नगरसेवक गणेश भोसले यांनी अर्थसाह्य केले आहे. या भागातील महिला आता सिलाई मशिनच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. त्यातून आपल्या परिवाराला आर्थिक मदत करू शकतात. शासनाच्या विविध योजना महिलांसाठी असतात. परंतु, त्या योजना त्यांच्यापर्यंत येत नाहीत. त्या आणण्यासाठी आम्ही छोटासा प्रयत्न केला आहे,” असे प्रतिपादन संगीता भोसले यांनी केले.

प्रभाग 30 मधील भोसले आखाडा येथे नगरसेवक गणेश भोसले यांच्या प्रयत्नांतून भारत सरकार पुरस्कृत जनशिक्षण संस्थेच्या वतीने महिलांना स्वयंरोजगारासाठी सुरू करण्यात आलेल्या सिलाई मशिन प्रशिक्षण केंद्राचे उद्‌घाटन संगीता भोसले यांच्या हस्ते झाले; यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी कोमल भोसले, केंद्राच्या कुंदा शिंदे, सय्यद शफाकत, भांबळ, झेंडे, आदींसह महिला उपस्थित होत्या.

भोसले पुढे म्हणाल्या की, पुढील काळात सिलाई मशिनबरोबरच ब्युटीपार्लरचे केंद्रही सुरू करण्याचा आमचा मानस आहे. प्रभाग 30 हा आमचे कुटुंब म्हणून प्रभागामध्ये विकासकामे करतो. परंतु, त्यांच्या कुटुंबाची आर्थिक प्रगती व्हावी, त्यांच्या कुटुंबाला महिलांकडून हातभार लागावा यासाठी महिलांना आता घरगुती व्यवसाय करण्यासाठी प्रशिक्षण देण्याचे काम केले जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)