भोसरी सहल केंद्रावर 20 लाखांची डागडुजी

पिंपरी – भोसरी येथील महापालिकेच्या सहल केंद्रात स्थापत्यविषयक कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी 20 लाख रूपये खर्च होणार आहेत.

महापालिकेमार्फत भोसरी येथील सर्व्हे क्रमांक एकमध्ये सहल केंद्र विकसित करण्यात आले आहे. सहल केंद्रातील तळ्याचा विस्तीर्ण जलाशय, त्यावर उभारलेले ध्यानधारणा केंद्र, बालचमुंसाठी धावणारी झुकझुकगाडी आणि विविध खेळणी तसेच हिरवागार बगिचा यामुळे हे सहल केंद्र शहराच्या नावलौकीकात भर घालणारे ठरले आहे. त्यामुळे पर्यटकांना हे सहल केंद्र आकर्षित करत आहे. त्यामुळे उद्यानाच्या तसेच तेथील साहित्याच्या देखभाल-दुरूस्तीची कामे नियमितपणे करणे आवश्‍यक असते. त्यानुसार, या सहल केंद्रातील स्थापत्यविषयक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेतर्फे ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या कामासाठी 25 लाख 13 हजार रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यामध्ये रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग शुल्क वगळून 23 लाख 94 हजार रूपये दर ठरवून निविदा मागविण्यात आल्या. त्यानुसार, सहा ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी एस. एस. एंटरप्रायजेस या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा 22.50 टक्के कमी म्हणजेच 18 लाख 56 हजार रूपये अधिक रॉयल्टी चार्जेस 84 हजार रूपये मटेरियल टेस्टींग चार्जेस 33 हजार रूपये अशी एकूण 19 लाख 74 हजार रूपये दराने निविदा सादर केली. नऊ महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानुसार, एस. एस. एंटरप्रायजेस या ठेकेदारासमवेत करारनामा करण्यात येणार असून त्यास स्थायी समितीने मान्यता दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)