भोसरी रूग्णालयातील सांडपाण्याचा फेरवापर

पिंपरी – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयातील लॉण्ड्रीच्या पाण्याबरोबरच नव्याने उभारण्यात येणाऱ्या भोसरी रूग्णालयातील सांडपाण्यावरही प्रक्रीया करून या पाण्याचा फेरवापर करण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकल्पाचे काम एकाच ठेकेदाराला देण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण 2 कोटी 35 लाख रूपये खर्च होणार आहे.

महापालिकेचे संत तुकारामनगर येथे 750 खाटांचे यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय आहे. रूग्णालयात डॉक्‍टरांसह परिचारीका, वॉर्डबॉय, आया यांना गणवेश आहेत. याशिवाय रूग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या रूग्णांना स्वतंत्र गणवेश दिला जातो. या कपड्यांची रूग्णालयातीलच लॉण्ड्रीत धुलाई केली जाते. हे कपडे धुण्यासाठी दररोज हजारो लिटर पाण्याचा वापर होतो. या लॉण्ड्रीच्या पाण्यावर प्रक्रिया करून या पाण्याचा फेरवापर करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याशिवाय भोसरी येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या 100 खाटांच्या रूग्णालयासाठीही ईटीपीद्वारे प्रक्रीया केलेल्या पाण्याचा पुर्नवापर करण्यात येणार आहे. वायसीएम रूग्णालयातील लॉण्ड्रीच्या पाण्याबरोबरच भोसरी रूग्णालयातील पाण्याचा पुर्नवापर करण्यासाठी आवश्‍यक कामे करण्याकरिता पर्यावरण अभियांत्रिकी विभागामार्फत ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. वायसीएमच्या कामासाठी 1 कोटी 24 लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. तर, भोसरी रूग्णालयासाठी 1 कोटी 25 लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. या दोन्ही कामांसाठी डब्ल्यु. टी. ई. इन्फ्रा प्रोजेक्‍टस या कंपनीने इतर ठेकेदारांपेक्षा कमी म्हणजेच अनुक्रमे 1 कोटी 17 लाख आणि 1 कोटी 18 लाख असा दर सादर केला. त्यानुसार, ही दोन्ही कामे डब्ल्यु. टी. ई. इन्फ्रा प्रोजेक्‍टस्‌ यांना देण्यात येणार असून त्यासाठी 2 कोटी 35 लाख रूपये खर्च होणार आहे.

एसटीपीच्या देखभालीसाठी अडीच कोटी
महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागामार्फत पिंपळे-निलख येथील मैलाशुद्धीकरण केंद्राची वार्षिक चालन आणि देखभाल-दुरूस्ती करण्यात येणार आहे. या कामासाठी ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. तीन वर्षे कालावधीसाठी 2 कोटी 63 लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. या कामांसाठी दोनच ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यामध्ये श्री विनय इंजिनिअरींग सर्व्हिसेस या ठेकेदाराने 5.10 टक्के कमी म्हणजेच 2 कोटी 50 लाख रूपये सुधारीत दर सादर केला. त्यांनाच हे काम दिले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)