भोसरी “पीएमपी’चे कार्यालय नवीन इमारतीत

पिंपरी – पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या भोसरी आगाराचे रुपडे लवकरच पालटणार आहे. भोसरी पीएमपी आगाराच्या आगार प्रमुख व इतर कामगारासाठी नुकतेच नवीन कार्यालय उभारण्यात आले असून कार्यालयाचे उद्‌घाटन लवकरच पीएमपीच्या अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्या हस्ते होणार आहे.

भोसरी येथील पीएमपीच्या आगाराचे अपुऱ्या जागेत काम चालत असून, या ठिकाणी कार्यशाळा कर्मचाऱ्यांसह इतर व्यवस्थापक कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता, आगारात बसण्यास अपुरी जागा होती. मात्र, दिवसेंदिवस काम वाढत असल्याने त्या संदर्भात अनेक वेळा वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा देखील करण्यात आला होता. त्यानुसार येथील आगारातील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कार्यालय उभारण्यात आले आहे. तेथे आगार प्रमुखासह, व्यवस्थपान कर्मचारी आणि लिपिकासाठी सोय करण्यात आली आहे. रंगरंगोटीसह सर्व कामे पूर्ण झाली आहे. केवळ फर्निचरचे काम बाकी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भोसरी येथून कात्रज, राजगुरूनगर येथे जाणाऱ्या बसच्या फेऱ्यांमुळे उत्पन्न वाढत आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्येही सेवा देण्यात येते. तर, दुसरीकडे आगारात “ब्रेक डाऊन’चे प्रमाण अगदीच नगण्य आहे. यामुळेच आगाराला 13 पीएमपीच्या आगारातून प्रथम आगार म्हणून मानांकन मिळाले आहे. नुकतीच “पीएमपी’च्या आगार परिसराची रंगरंगोटी आणि देखभाल दुरुस्ती करण्यात आली आहे. भोसरी आगारात सुमारे 97 सर्व बसेस डिझेलच्या इंजिनावरील असून आगारात एकूण साडेचारशे कर्मचारी कार्यरत आहेत.

आगारातील नवीन कार्यालयामुळे कामामध्ये आणखी सुसूत्रता येण्यास मदत होईल. किरकोळ कामे व फर्निचरचे काम पूर्ण झाल्यानंतर कार्यालय वापरासाठी खुले होईल. त्याचप्रमाणे परिसराची साफसफाई आणि देखभालीचे कामही हाती घेण्यात आले अशी माहिती आगारप्रमुख शांताराम वाघेरे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)