“लागिरं झालं जी’च्या अजिंक्‍य व शीतल यांचे हस्ते होणार उद्‌घाटन

भोसरी येथील दालनात चांदी व हिऱ्यांच्या अलंकारांसाठी दोन स्वतंत्र विभाग असणार आहेत. यावेळी गोल्ड ट्री (भिशी) या योजनेचे आयोजन करण्यात येणार असून योजनेत सहभाग नोंदविणाऱ्यांना चांदीचे नाणे भेट देण्यात येईल. खरेदी केलेल्या प्रत्येक दागिन्याचा विनामोबदला विमा काढण्यात येणार आहे.
सिद्धार्थ शहा,संचालक, चंदूकाका सराफ ऍन्ड सन्स

पुणे: पासून शुद्ध सोने व पारदर्शक व्यवहारासाठी प्रसिद्ध असलेल्या चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स प्रा. लि. या सुवर्णपेढीच्या 16 व्या शाखेचे उद्‌घाटन रविवार, दि. 15 जुलै 2018 रोजी सकाळी 10ः30 वाजता संपन्न होणार आहे.
झी मराठी वरील सध्याची लोकप्रिय मालिका “लागिरं झालं जी’ मधील अजिंक्‍य म्हणजेच नितीश चव्हाण आणि शितल म्हणजेच शिवानी बावकर या लोकप्रिय जोडीच्या शुभहस्ते या दालनाचे उद्‌घाटन होणार आहे. याप्रसंगी अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आळंदी रस्त्यावर भोसरी येथे टिंगरे पेट्रोल पंपाशेजारी आलिशान व प्रशस्त जागेत चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स प्रा. लि.च्या या शोरूमचा शुभारंभ होत असून सोने, चांदी व हिऱ्यांच्या अलंकारांसाठी स्वतंत्र दालने राहणार आहेत.
या शोरूमच्या उद्‌घाटनानिमित्ताने गोल्ड ट्रीफ (भिशी) या योजनेचे खास आयोजन केले असून या योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांना चांदीचे नाणे भेट म्हणून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर खरेदी केलेल्या प्रत्येक दागिन्याचा विनामोबदला इन्शुरन्स करण्यात येणार आहे.

भोसरीवासीयांच्या सोयीकरिता सुरु केलेल्या या दालनात पुण्यातील अन्य शोरूम्सप्रमाणेच ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स प्रा. लि. चे श्री. सिद्धार्थ शहा यांनी व्यक्त केली असून सर्वांनी उद्घाटनप्रसंगी अवश्‍य उपस्थित रहावे असे आग्रहाचे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)