पिंपरी – भोसरी येथील संत तुकारामनगर येथे बंद घराचे कुलूप तोडून सुमारे पावणे दोन लाखांची घरफोडी करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी पहाटे सव्वा तीनच्या सुमारास घडली.

प्रशांत बाजीराव देशमुख (वय-32, रा. तुकारामनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत यांची आई घर बंद करुन गावी गेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील दागिने व मौल्यवान साहित्य असा एक लाख 78 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पी. आर. कठोरे तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)