भोसरीमध्ये आढळला दुर्मिळ रंगहीन विरुळा

पिंपरी – विरुळा हा पुणे जिल्ह्यात सर्रास सापडणारा साप. मात्र, भोसरी येथील धावडेवस्ती येथे एका घरात चक्क रंगहीन विरुळा साप आढळला. असा साप दिसणे दुर्मिळ असल्याचा दावा महापालिकेच्या बहिणाबाई चौधरी सर्पोद्यानाचे अभिरक्षक डॉ. दीपक सावंत यांनी केला आहे.

धावडे आळी येथील सुखदेव धावडे मार्ग येथील अमर धावडे यांच्या घरात हा साप आढळून आला. साप पाहून धावडे कुटुंबियांना पळता भुई थोडी झाली. सर्प मित्र अमर गोडांबे यांना याठिकाणी पाचारण करण्यात आले. शिताफीने त्यांनी हा साप पकडला. हा दुर्मिळ साप असल्याची माहिती अमर गोडांबे यांनी दिली. साधारण एक फूट लांबीचा असणारा हा साप बिनविषारी असला तरी चिडका स्वरूपाचा असतो अशीही माहिती गोडांबे यांनी दिली. गोडांबे यांच्यासह अल्ताफ सय्यद, विक्रम भोसले, अभिषेक फुलारी या सर्पमित्रांनी या सापाला सुरक्षित स्थळी जंगलात सोडून देत जीवदान दिले आहे.

-Ads-

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. दीपक सावंत म्हणाले, विरुळा हा साप पुणे जिल्ह्यात सामान्यपणे आढळतो. अलबिनो जातीतील हा साप आहे. शरीरामध्ये रंगद्रव्य नसल्याने तो रंगहीन झाला असून हा प्रकार अत्यंत दुर्मिळ आहे. पाणवठ्याजवळ हा साप राहतो. मासे आणि बेडुक तो खातो. हा बिनविषारी साप असल्याची माहितीही त्यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)