भोसरीत सराईत गुन्हेगार जेरबंद

भोसरी – एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसासह अटक केले आहे. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.

भीम थापा या सराईत गुन्हेगारास अटक केली आहे. इंद्रायणीनगर येथे एक गुन्हेगार हत्यार घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस शिपाई विजय दौडकर यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसीचे वरीष्ठ निरीक्षक भीमराव शिंगाडे, विजय टीकोळे, उपनिरीक्षक रावसाहेब वांबळे, अजय भोसले, रवींद्र तिटकारे, संदीप भोसले, संजय भोर, किरण काटकर, नवनाथ पोटे, विजय दौडकर, प्रसाद कलाटे, अमोल निघोट, किरण विश्‍वासे, विशाल काळे या पथकाने सापळा रचला. संशयीत भीम थापा हा आला असता त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतुसे आढळून आली. त्याच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)