भोसरीत रिक्षा चालकाचा खून

पिंपरी – एमआयडीसी भोसरी येथे रिक्षा चालकाचा चाकूने वार करत खून करण्यात आला. ही घटना गुरूवारी (दि. 12) मध्यरात्री घडली.

विनोद माताफेर गिरी असे खून झालेल्या रिक्षा चालकाचे नाव असून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दयाराम शितलाप्रसाद गिरी, बाबूराम शितलाप्रसाद गिरी व जय प्रकाश कृष्णा गिरी या तिघांना अटक केली आहे.

विनोद आणि आरोपी एकाच गल्लीत राहतात. विनोद उशिरा घरी आले. त्यांचा आरोपींच्या दारासमोर असलेल्या पाण्याच्या ड्रमला धक्का लागला. यावरून आरोपींनी त्यांच्यासोबत वाद घातला. मागील काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद होत होते. रात्री वाद विकोपाला गेला, त्यातून त्यांनी विनोदवर चाकूने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने विनोद यांचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)