भोसरीत महिलेची झोपडी जाळली

पिंपरी – भोसरी येथे एका 50 वर्षीय महिलेला मारहाण करत तिची झोपडी जाळण्यात आली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 5) रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली.

या प्रकरणी कमल शंकर कारगदे (वय-50, रा. भोसरी सहल केंद्रा समोरील मोकळे मैदान) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी अमित चंद्रकांत लांडगे व त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित लांडगे याने फिर्यादी व त्यांची मुलगी सपना यांना लाकडी दांडक्‍याने मारहाण करत त्यांची झोपडी जाळली. झोपडी का जाळण्यात आली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)