भोसरीत मंगळसूत्र हिसकावले

पिंपरी – घरकाम करणा-या मोलकरणीने मालकिणीचे 1 लाख 80 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरल्याची घटना भोसरी येथे घडली आहे. याप्रकरणी प्रिती रासकर (वय 32, रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोलकरीण भोसरी येथील नारायण हट सोसायटी, साइकल्प बंगला, जय गणेश साम्राज्य भोसरी येथे मागील काही दिवसांपासून घरकाम करीत होती. मागील आठवड्यात फिर्यादी यांच्या घरी घरकाम करीत असताना फिर्यादीची नजर चुकवून घरातील 1 लाख 80 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेले. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)