भोसरीत प्रेयसीवर चाकूने वार

भोसरी – प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीच्या घरी जाऊन तिच्या घरच्यांसमोर तिच्या गळ्यावर वार केला. हा प्रकार सोमवारी (दि. 14) रात्री भोसरी येथे घडला.

या प्रकरणी 17 वर्षीय तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शाहरुख रफिक शेख (वय-22, रा. आदर्शनगर, मोशी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपूर्वी शेख याने पीडित तरुणीला लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे दोघांमध्ये किरकोळ भांडण झाले आणि तरुणीने शेख याच्याशी बोलणे बंद केले. प्रेयसी बोलत नसल्याचा राग मनात धरून शेख सोमवारी रात्री तिच्या घरी गेला. तरुणीच्या वडिलांशी असभ्य वर्तन केले. तरुणीला मारहाण करत तिच्या गळ्यावर वार केले. यावरून तरुणीने भोसरी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी शेख याला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)