भोसरीत दोन कंपन्यांना आग

पिंपरी – भोसरी एमआयडीसी मधील टी ब्लॉक येथे ट्रान्सपरंट एनर्जी सिस्टिम्स प्रा. लि. आणि भिडे अँड सन्स या कंपन्यांना रविवारी रात्री आग लागली. यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र कंपनीतील कागदपत्रे व इतर साहित्य जळून खाक झाले.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री आठच्या सुमारास सुभाष गायकवाड नावाच्या व्यक्तीने भोसरी एमआयडीसी मधील टी ब्लॉकमधील दोन कंपन्यांना आग लागल्याची माहिती दिली. त्यानुसार पिंपरी अग्निशमन विभागाचे दोन, प्राधिकरण एक, भोसरी एक असे एकूण चार बंब घटनास्थळी दाखल झाले. तीन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. कंपनी बंद असल्यामुळे कंपनीतील कोणीही कर्मचारी अथवा अधिकारी तेथे उपस्थित नव्हते.

-Ads-

आग दुसऱ्या मजल्यावर लागली असल्याने आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. कंपनीच्या वतीने माहिती देण्यासाठी घटनास्थळी कोणीही उपस्थित नसल्याने आर्थिक नुकसान किती झाले हे कळू शकले नाही. हे आग विझवण्याचे काम लिडिंग फायरमन अशोक कानडे, दिलीप कांबळे, बाळासाहेब वैदय, सारंग मगळुरकर, विनायक नाळे, शंकर पाटील, मयुर कुंभार, बागडे अशा 20 जवानांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)