भोसरीत तोतया फौजदार गजाआड

पिंपरी – फौजदार असल्याची बतावणी करुन हॉटेल व्यावसायिक, पानटपरी, किराणा दुकानदार तसेच इतर ठिकाणावरुन हप्ता गोळा करणाऱ्या एका तोतया पोलीसाला गुन्हे शाखा पथकाने गजाआड केले. ही कारवाई भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात करण्यात आली.

राजेंद्र मोहन पाटेकर (वय-55, रा. वैजयंती निवास, पाण्याच्या टाकीजवळ, संत तुकारामनगर, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे. त्याच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात अशाच प्रकारचे गुन्हे पुणे शहर पोलिसांतही दाखल आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी दीपक खरात, गणेश सावंत, प्रवीण पाटील, विशाल भोईर यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, चाकण पोलीस ठाणे हद्दीत एकजण गुन्हे शाखेचा पोलीस असल्याचे सांगून हॉटेल व्यवसायिक, पानटपरी, किराणा दुकानदार यांच्याकडून हप्ता गोळा करत आहे. याची शहनिशा केली असता तो तोतया असल्याचे निष्पन्न झाले. हा तोतया फौजदार आज भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून आरोपी राजेंद्र पाटेकर याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हे शाखेचा फौजदार असल्याचे भासवून हॉटेलात फुकट जेवायचो, त्यांच्याकडूनच पैसे वसूल करायचो, छोट्या फेरीवाल्यांकडून हप्ता गोळा करायचो अशी कबुली दिली. कोणी पैसे देण्यास नकार दिला तर त्याला पोलीस ठाण्यात नेण्याची धमकी देखील द्यायचो, असेही सांगितले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या तोतयाला अटक करुन चाकण पोलिसांच्या हवाली केले आहे. चाकण पोलीस तपास करत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)