भोसरीत ज्यूस विक्रेत्याचा खून

पिंपरी – धारदार शस्त्राने डोक्यावर वार करुन एका ज्यूस विक्रेत्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (रविवारी) सकाळी भोसरी येथील महापालिकेच्या रुग्णालयासमोर असलेल्या मैदानातून उघडकीस आली.

सनाऊल हक सय्यद शेख (वय ३२, रा. सागर लांडगे चाळ, भोसरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी सातच्या सुमारास काही स्थानिक नागरिकांना भोसरी येथे महापालिका रुग्णालयाच्या समोरील मैदानात एक व्यक्ती जखमी अवस्थेत आढळून आला. त्यांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन याची माहिती दिली. माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. त्यावेळी एक तरुणाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खून केला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी मृत तरुणाची झडती घेऊन त्याच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांव्दारे त्याची ओळख पटवली. मृत तरुणाचे नाव सनाऊल असून त्याचा भोसरी परिसरात ज्यूसचा व्यावसाय आहे. पोलिसांनी त्याच्या घरच्यांची विचारपुस केली असता शनिवारी रात्री पासून सनाऊल घरी परतलाच नसल्याचे त्यांनी सांगितले. सनाऊलचा खून कोणी आणि का केला हे अद्याप समजूशकले नाही. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)