भोसरीत जल्लोष ; चिंचवडमध्ये फुगडी

निर्णयाचे स्वागत : भाजप नगरसेवकांनी पेढे वाटले

पिंपरी – मराठा समाजाला आरक्षणाचे दिलेले आश्वासन भाजप सरकारने पाळले आहे. मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याबाबतचे विधेयक आज विधानसभा आणि विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आले. सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानिमित्त भाजपच्या नगरसेवकांनी भोसरीत जल्लोष केला.

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या कार्यालया समोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, नगरसेवक लक्ष्मण सस्ते, विकास डोळस, लक्ष्मण उंडे, ऍड. नितीन लांडगे, वसंत बोराटे, कुंदन गायकवाड, संजय नेवाळे, सागर गवळी, राजेंद्र लांडगे, संतोष लोंढे, नगरसेविका स्वीनल म्हेत्रे, साधना मळेकर, अश्विनी जाधव, सारीका सस्ते, सुवर्णा बुर्डे, हिराबाई घुले, निर्मला गायकवाड, प्रा. सोनाली गव्हाणे, भिमाबाई फुगे, नम्रता लोंढे, साधना तापकीर, विजय फुगे, दत्ता परांडे, माजी नगरसेवक शांताराम भालेकर आदी उपस्थित होते.

महापौर राहुल जाधव म्हणाले की, भाजप सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द पाळला आहे. सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले आहे. अभ्यासपुर्वक आरक्षण दिले आहे. त्यामुळे कायद्याच्या कचाट्यात देखील हे आरक्षण टिकणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी आमदार महेश लांडगे यांनी वारंवार आवाज उठविला. विधानसभेत सरकारकडे विचारणा केली होती. इतर समाजातील आर्थिकदृष्ट्‌या दुर्बल असलेल्या सर्व घटकाला आरक्षण मिळाले पाहिजे. त्यादृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे. धनगर समाजाला देखील लवकरच आरक्षण मिळेल.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले. त्यामुळे सर्वच समाजातील नागरिक आनंदी आहेत. मराठा, माळी, मुस्लीम सर्व समाजातील नागरिक जल्लोषात सहभागी झाले होते. त्यामुळे एकीचे दर्शन घडले. “तुमचं, आमच नातं काय, जय भवानी, जय शिवराय’, “जय भवानी, जय शिवाजी’, “भाजप सरकारचा विजय असो’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

चिंचवडमध्ये पक्षनेत्यांची फुगडी
मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर होताच चिंचवडमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटले. यावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस उमा खापरे यांनी नगरसेवकांसोबत चक्‍क फुगडी घालून आनंदोत्सव साजरा केला. नगरसेवक नामदेव ढाके, शितल शिंदे, स्वीकृत सदस्य ऍड. मोरेश्‍वर शेडगे, बाबु नायर, माजी नगरसेवक राजु दुर्गे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)