भोसरीत जलतरण तलावात तरुण बुडाला

पिंपरी – भोसरी सहल केंद्रातील जलतरण तलावात बुडून एका 22 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. 26) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला.

सनी बाळासाहेब ढगे (रा. भोसरी) असे तलावात बुडालेल्या तरूणाचे नाव आहे. भोसरी सहल केंद्रात महापालिकेच्या वतीने जलतरण तलाव बांधण्यात आलेला आहे. या तलावात दुपारी साडेतीनच्या सुमारास सनी पोहण्यासाठी आला असता तो बुडाला.

हा प्रकार लक्षात येताच त्याला पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला. सनी याचा मृतदेह सायंकाळी साडेचारच्या सुमारास महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयात आणण्यात आला. त्यानंतर भोसरी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)