File Photo

भोसरी – जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे 19 ते 22 एप्रिल या कालावधीत कोकण लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोकणी लोकसंस्कृतीची अनुभूती घेण्याची संधी पिंपरी-चिंचवडकरांना यानिमित्ताने मिळणार आहे. भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात हा महोत्सव होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय पाताडे यांनी दिली. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे. त्यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आदी उपस्थित राहणार आहेत.

तत्पूर्वी या महोत्सवाची सुरुवात गुरूवारी सायंकाळी सहा वाजता शोभायात्रेने होणार आहे. पीएमटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून लांडगे नाट्यगृहापर्यंत ही शोभायात्रा निघणार आहे. दशावतार, शक्तीतुरा, संगीत भजनाचा डबलबारी सामना, मालवणी गजाली, एकांकिका आदी विविध कार्यक्रमांनी हा महोत्सव रंगणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर यांना कोकण भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

प्रतिष्ठानतर्फे सुरू करण्यात आलेल्या स्वयंवर वधुवर सूचक वेबसाईटचे उद्‌घाटन भाजप प्रवक्ते माधव भंडारी व खासदार नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. महोत्सवाचा समारोप रविवारी (दि. 22) दुपारी तीन वाजता कोकण वधु-वर मेळाव्याने होणार आहे. त्यानंतर पावने इले रे ही मालवणी एकांकिका होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)