भोसरीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पिंपरी – भोसरीतील लांडेवाडी परिसरात एका 17 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी भोसरी पोलिसांना एकाला ताब्यात घेतले आहे.

राजेश गालफाडे (रा. भोसरी) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पिडीत मुलगी घराबाहेर कपडे वाळत घालत असताना, राजेश गालफाडे याने तिला धक्का देऊन खाली पाडून शिवीगाळ केली. तसेच, यापूर्वीही महाविद्यालयात जात असताना, तिचा पाठलाग करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी भोसरी-एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)