भोसरीतील डब्ल्यू.टी.ई. कंपनीची “पर्यावरण वारी’

वसुंधरेच्या संवर्धनासाठी जनजागृती: पालखी मार्गावर स्वच्छता मोहीम

भोसरी – पाणी व सांडपाणी प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील डब्ल्युटीई इन्फ्रा प्रोजेक्‍ट प्रा. लि. कंपनीच्या वतीने यावर्षी “पर्यावरण वारी’ उपक्रम हाती घेण्यात आला. त्याअंतर्गत वसुंधरेच्या रक्षणासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच, वारीदरम्यान वारकऱ्यांना पर्यावरण रक्षणाचा संदेश असलेल्या छत्री, टी-शर्ट वाटपही करण्यात आले.

विशेष म्हणजे, कंपनीतील सर्व कर्मचारी, अधिकारी आणि संचालकांनी उत्साहात वारीमध्ये सहभाग दर्शवला. तसेच, पालखी मार्गावर वारी पुढे गेल्यानंतर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती आणि कृतीशील पुढाकार घेणाऱ्या या कंपनीचा आदर्श उद्योगनगरीतील मोठ्या कंपन्यांनी घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान दिघीतील, मॅगझीन चौकात आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते “पर्यावरण वारी’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वारकऱ्यांना विविध उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कंपनीचे संचालक अशोक कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, विनोद भोळे, गुरुप्रसाद तेलकर, दर्शना देशपांडे, प्राजक्ता पाटील, सुभाष धोंडकर, सतीश पाटील, युवराज शिंदे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

प्लॅस्टिक न वापरण्याचे वारकऱ्यांना आवाहन
कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी प्लॉस्टिकचा वापर टाळण्याबाबत जनजागृती केली. जनजगृतीचे संदेश असणारे टी-शर्ट परिधान केले होते. तसेच, “प्लॅस्टिक हटाव’ असे संदेश असलेले टी-शर्ट वाटप करण्यात आले. मॅग्झीन चौक ते दिघीपर्यंत प्लॅस्टीकच्या जनजागृतीबाबत रॅली काढण्यात आली.”प्लॅस्टिक हटवा,देश वाचवा’, “प्लास्टिक वापरणे सोडा, पर्यावरणाशी नाते जोडा’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. राज्य सरकारने घेतलेल्या प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाला समर्थन आणि सक्रीय पुढकार दर्शवण्यासाठी कंपनीच्या वतीने प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)