भोसरीकरांसाठी अन्नधान्य वितरण कार्यालय

पिंपरी – पुण्यात असणारे अन्नधान्य वितरण (रेशनिंग) कार्यालयाचे अखेर भोसरीत स्थलांतरण झाले आहे. यामुळे नागरिकांची मोठी सोय झाली आहे. आमदार महेश लांडगे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत होते. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

भोसरीतील पांजरपोळ येथे सुरु झालेल्या अन्नधान्य वितरण कार्यालयाचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. यावेळी महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, नगरसेविका भीमाबाई फुगे, हिराबाई घुले, नम्रता लोंढे, कमल घोलप, योगिता नागरगोजे, यशोदा बोईनवाड, स्वीनल म्हेत्रे, साधना मळेकर, सारिका लांडगे, नगरसेवक सागर गवळी, संतोष लोंढे, नितीन लांडगे, कुंदन गायकवाड, राजेंद्र लांडगे, विकास डोळस, लक्ष्मण उंडे, गोपीकृष्ण धावडे, विजय लांडे, दिनेश यादव, सम्राट फुटे उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले, गेले 20 ते 25 वर्षांपासून पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांना रेशनिंगच्या कामासाठी पुण्यामध्ये जावे लागत होते. त्यामुळे त्यांच्या पैसे आणि वेळेचा अपव्यय होत होता. त्यासाठी रेशनिंगचे कार्यालय भोसरीत व्हावे या मागणीसाठी अन्न पुरवठा मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत भोसरी मतदार संघात स्वतंत्र परिमंडळ कार्यालय फ विभाग मंजूर करण्यात आला. त्यानुसार इतर मतदार संघात देखील स्वतंत्र कार्यालय होणार आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

सर्वांना सोबत चांगले काम करु असे परिमंडळ अधिकारी एन.पी. भोसले यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संयोजन संजय गांधी निराधार योजनेचे भोसरी विधानसभेचे अध्यक्ष तुकाराम बढे, रास्तभाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती फुगे, दिलीप तापकीर, बाळासाहेब गोडसे, बी. टी. फुगे, प्रवीण डोळस यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)