भोलवडेत समाजप्रबोधनपर साहित्याचे वाटप

जोगवडी – भोर तालुक्‍यातील नसरापूर-भोलवडे जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून 12 गावांना दलित वस्ती समाजप्रबोधन साहित्याचे वाटप जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस इतर मान्यवरांसह संबंधित गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
मंगळवारी (दि. 12) हा कार्यक्रम पार पडला. दर मंगळवारी नसरापूर- भोलावडे जिल्हा परिषद गटातील जनतेच्या विविध समस्या सोडवण्यासाठी विठ्ठल आवाळे भोर पंचायत समितीमध्ये येतात. या कार्यक्रमास भोर तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक शरद पडवळ, पंचायत समितीचे समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ सहायक एस. टी. भगत, बारे बुद्रुक गावचे सरपंच सोपान दानवले, नऱ्हे गावचे उपसरपंच विजय गोळे, संगमनेर गावच्या उपसरपंच रेशमा बांदल, नितीन बांदल, विद्यार्थी, कॉंग्रेसचे निखिल गोरड, युवक कार्यकर्ते तुषार दानवले यांच्यासह ग्रामसेवक अभंग, कुंभार, डोंबाळे, जगताप ओंबासे यांच्यासह संबंधित गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)