पुणे जिल्हा: भोर शहर राष्ट्रवादीला मोठा धक्का.

भोर- माजी उप नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक असलेल्या गणेश ऊर्फ मुन्ना पवार यांनी भोर नगर पालिकेच्या ऐन निवडणुकीच्या काळातच राष्ट्रवादीला कंटाळून कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला असून, राष्ट्रवादीला मोठा धक्काच दिला आहे.गणेश पवार यांनी आमदार संग्राम थोपटे यांचे कुशल नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांसह कॉंग्रेस पक्षात कोणत्याही अटीशिवाय प्रवेश केला आहे.भोर तालुका कॉंग्रेस पक्षाच्या रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेच्या पक्ष कार्यालयात आमदार संग्राम थोपटे यांनी गणेश पवार यांचे स्वागत करून सत्कार केला. कॉंग्रेस पक्षात गणेश पवार यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल असे अश्वासन आमदार थोपटे यांनी दिले.

यावेळी स्वामी धुमाळ यांनीही कॉंग्रेस पक्षात प्रवेश करून राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. या पक्ष प्रवेशाप्रसंगी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णाजी शिनगारे, भोर विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल आवाळे, तालुका कॉंग्रेस अध्यक्ष शैलेश सोनवणे, दिलीप बाठे, भोर शहर युवकाध्यक्ष समिर सागळे, माजी उप नगराध्यक्ष उमेश देशमुख यांचे सह कॉंग्रेस चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)