भोर शहरातील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश.

भोर- भोर तालुका शिवसेना आणि तालुका युवा सेनेच्या कुंभार टेकडी (सम्राट चौक) येथील शाखेचे उद्‌घाटन रविवारी (दि. 16) पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख दत्तात्रय टेमघरे यांच्या हस्ते झाले.
युवासेनेचे तालुका प्रमुख आणि भोर नगर पालिकेचे माजी नगर सेवक केदार देशपांडे यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या शाखेच्या उद्‌घाटनप्रसंगी सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब चांदेरे, युवा नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे, महिला शिवसेना जिल्हा प्रमुख स्वाती ढमाले यांच्यासह भोर शहर आणि तालुका शिवसेना, तसेच युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी कुंभार टेकडी, सम्राट चौक, भोईआळी भागातील सचिन चुनाडी, एकनाथ कांबळे, आकाश कोठावळे, गणेश नाचन, निखील शिंदे, सागर उल्हाळकर, प्रशांत कुंभार, महेश नाईक, ओंकार कोंढाळकर, सुमीत राऊत, हृतिक खोपडे, महेश शिंदे, अथर्व महाडिक, सुमित कांबळे, तेजस जाधव, गौरव कुंभार, रोहित कोठावळे, विशाल वीर, यांच्यासह सुमारे 150 युवकांनी शिवसेना आणि युवासेनेत प्रवेश केला असल्याचे तालुका युवा सेना प्रमुख केदार देशपांडे यांनी सांगितले.
शिवसेना आणि युवा सेनेत प्रवेश केलेल्या या सर्व युवकांचा भगवी शाल, श्रीफळ आणि भगवे झेंडे देऊन जिल्हा प्रमुख दत्तात्रय टेमघरे, बाळासाहेब चांदेरे, कुलदीप कोंडे, केदार देशपांडे यांच्या हस्ते शिवसेनेत स्वागत करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भोर शहर युवासेना प्रमुख किरण पवार, सुशील तारू, सचिन चोरघे, स्वप्निल शिनगारे, अमित शेवते, गणेश जावळेकर, विनोद देशपांडे, जमीर शेख आदी पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)