भोर-वेल्ह्यातील 25 शाळांना साहित्य वाटप

भोर- भारत सरकारच्या सीएसआर योजनेअंतर्गत भोर तालुका पंचायत समिती आयडिया सेल्युलर कंपनी यांनी भोर तालुका पंचायत समितीच्या नसरापूर आणि किकळी बिट मधील 13 प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आणि वेल्हे तालुक्‍यातील 11 प्राथमिक शाळांचा गेल्या महिनाभरापासून सर्व्हे करून दुर्गम डोंगरी भागातील शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी प्रत्येक शाळेच्या मागणीनुसार शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम भोर तालुका पंचायत समितीच्या सभापती मंगल बोडके यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपसभापती लहूनाना शेलार यांच्या प्रयत्नातून पार पडला.
या कार्यक्रमात 25 शाळांना एलसीडी, प्रिंटर, लायब्ररी कपाटे, वॉटर प्युरिफायर, ढोल ताशा, लेझीम संच, टेबल खुर्च्या, सिलिंग फॅन, स्टेशनरी किट आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी क्रीडा आणि सांघिक स्पर्धातील विजेत्या संघांचा सुवर्ण व रजत पदक देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शैलजा दराडे, आयडिया सेल्युलरचे महाराष्ट्र गोवा विभागाचे एच. डी. विशाल शर्मा, अभिजीत केळकर, पंचायत समिती सदस्य श्रीधर किंद्रे, दमयंती जाधाव, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, दिपेंद्र रॉय, मिलिंद दिघे, शिरीष शेटे, केतन चव्हाण, भोर तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष महेंद्र सावंत, पोपट निगडे, सुदाम ओंबळे, राम टापरे, पै.अमर खुटवड, प्राचार्य एस.टी,चव्हाण यांचे सह शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते. यावेळी शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांन अस्मिता योजनेअंतर्ग जिल्ह्यातील 26 हजारांपेक्षा जास्त मुलींना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)