भोर, मुळशी वेल्ह्यातील कनेक्‍टीव्हिटी वाढणार

पिरंगुट – बारामती लोकसभा मतदार संघातील बीएसएनएलच्या 42 टॉवर्सला परवानगी मिळाली असून यापैकी चार टॉवर्सचे काम सुरू झाले आहे. मुळशी, भोर, वेल्हा आदी तालुक्‍यातील दुर्गम भागात संपर्क करण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यासाठी सुप्रिया सुळे यांनी बीएसएनएल बीटीएस टॉवर मिळावे अशी मागणी केली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी भागातील नागरिकांची सोय व्हावी म्हणून या मतदार संघासाठी ‘बीएसएनएल’ ‘बिटीएस’ मनो-यांची मागणी केली होती. त्यांनी एकूण 50 मनो-यांची मागणी केली होती. त्यापैकी 42 मनो-यांना मंजुरी मिळाली असून चार मनो-यांची कामे सुरू झाली आहेत.

यामुळे या भागातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. भोर तालुक्‍यातील वाकुंबे, वेळवंड, शिरवली व वेल्हे तालुक्‍यातील केळद याठिकाणी कामांना सुरवात झाली आहे.

तालुकानिहाय मंजूर टॉवरची संख्या
मुळशी – 7
भोर – 8
दौंड – 10
इंदापूर – 6
बारामती – 9
पुरंदर – 2


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)