भोर-मुळशी तालुक्‍यांचा दुष्काळी यादीत समावेशासाठी राज्य शासनाला भाग पाडू

शरद पवार : अडचणीच्या काळात सरकारने पाठीमागे उभे राहण्याची गरज

कापूरहोळ- सध्या आपण अडचणीच्या काळातून जातो आहे. करण सुरुवातील चांगला पाऊस झाला मात्र, त्यानंतर तो गडप झाला हा टप्पा मोठा असल्याने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी दुष्काळ आहे. त्यामुळे पिकेही धोक्‍यात आली आहे. या अडचणीच्या काळात सरकारने पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. तसेच तसेच राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी यादीत भोर-मुळशीचे नाव नसल्याने या तालुक्‍यांची नावे या यादीत घेण्यासाठी आपण भाग पाडू, असे आश्‍वासन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिले.
माळेगाव (नसरापूर , ता. भोर) येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून पवार पब्लीक चॅरीटेबल ट्रस्ट व टाटा ट्रस्ट सी. एस. स्पेशालीटी केमिकल्स यांच्या संयुक्‍त विद्यमाने भोर व वेल्हे तालुक्‍यातील एकूण 196 आशा वर्कर व 804 शोलय मुलींसाठी मोफत सायकल वितरण समारंभ पार पडला, त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, जिल्ह्याचे नेते शांताराम इंगवले प्रदीप मरळ, भोर पंचायत समितीचे माजी उपसभापती लहूनाना शेलार, भोर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संतोष घोरपडे, भोर व वेल्हे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष हाराळे, मनोज जाधव, भोरचे गटशिक्षणाधिकारी अशोक गोडसे, वेल्हेचे संजय तांबे टाटा ट्रस्टचे आशिष देशपांडे, भरत मेहेता, स्वप्नाली शहा, अमित कौल, संतोष भोसले, सचिन घोटकुले व भोर-वेल्हे तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नेतेमंडळी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्‍तीने अथवा पदाधिकाऱ्याने शासनाच्या विविध योजना राबवून विकासकामे केली पाहीजेत. त्याचबरोबर आपली स्वत:ची सामाजिक बांधिलकी म्हणून समाजासाठी काम करावे. त्यातूनच बारामती लोकसभा मतदारसंघात अंगणवाड्यांना वीज व पाण्याची सोय स्वतंत्ररित्या केली आहे. व मतदार संघातील प्रत्येक तालुक्‍यात पवार चारीटेबल ट्रस्टच्या वतीने संविधान स्तंभ उभारण्याचे काम सुरू आहे. त्याद्वारे आंबेडकरांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करावयाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भोर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संतोष घोरपडे, तर सूत्रसंचालन संचालन विठ्ठल पवार यांनी केले.

  • …त्याच क्षेत्राच यशस्वी व्हावे
    राज्याच्या देशाच्या शैक्षणीक घडामोडीत मुलीं मागे राहू नये, यासाठी लहान पणापासूनच मुला-मुलींना शिक्षणाची आवड निर्माण करा. अर्धवट शिक्षणामुळे आयुष्यात काही प्रगती करता येत नाही. त्यामुळे शिक्षणाचे महत्त्व आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजात रूजणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. आशाताई समाजाची सेवा अत्यंत चांगल्या करीत आहेत. त्यांच्या कामात सायकलमुळे थोडासा हातभार लागणार आहे. दिवाळीची भेट सायकल रूपाने दिली आहे.त्याचा वापर सुयोग्य करावा. मुली ज्याक्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्याक्षेत्रात त्यांनी यशस्वी व्हावे, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्‍त केली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)