भोर मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटी 41 लाख मंजूर

संग्रहित छायाचित्र....

आमदार संग्राम थोपटे यांची माहिती

भोर – भोर विधानसभा मतदारसंघातील भोर, वेल्हे आणि मुळशी या तीन तालुक्‍यांतील 31.42 कि.मी. लांबीच्या रस्त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 25 कोटी 41 लाख 68 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.

या कामांच्या मंजुरीसाठी आमदार थोपटे यांनी जून 2018 मध्ये प्रस्ताव शासनास सादर केला होता. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता पाटील यांच्या समवेत बैठक घेऊन या तीनही तालुक्‍यातील रस्त्यांची गरज विचारात घेऊन सदरचे रस्ते प्रस्तावित केले होते. भोर, वेल्हे आणि मुळशी तालुक्‍यात अनेक पर्यटनस्थळे असून पर्यटक व स्थानिकांची मोठी वर्दळ असल्याने मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत 2019-20 मध्ये 25 कोटी 42 लाख 68 हजार रुपयांची मंजूर करण्यात आला आहे.

भोर तालुक्‍यातील 6 कि.मी.च्या रस्त्यांसाठी 4 कोटी 40 लाख 38 हजार रुपये, वेल्हे तालुक्‍यातील 8.53 कि.मी.च्या रस्त्यांसाठी 7 कोटी 35 लाख 51 हजार आणि मुळशी तालुक्‍यातील 16.89 कि.मी.च्या रस्त्यासाठी 14 कोटी 10 लाख 4 हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. जनतेच्या समस्या दूर करण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद, नाबार्ड, आमदार निधी आणि डोंगरी विकास निधीतून तसेच जिल्हा नियोजन समिती अशा योजनांच्या माध्यमातून मतदारसंघात कामे केली जाणार आहेत, अशी माहिती आमदार थोपटे यांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)