भोर नगरपालिकेसाठी 93 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध

छाननीत चार अर्ज अवैध, 3 जुलैला अंतिम यादी

भोर – भोर नगरपालिकेच्या 15 जुलैला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 25) नगराध्यक्ष पदासाठी 9, तर नगरसेवक पदासाठी 95 असे एकूण 104 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आज (दि. 26) झालेल्या नामनिर्देशन पत्रांच्या छाननीत चार अर्ज अवैध ठरवण्यात आले असून 93 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश सूर्यवंशी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी संतोष वारुळे यांनी दिली.

नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे दोन अर्ज दाखल होते, त्यातील दीपाली शेटे यांचा अर्ज प्रथम दाखल झाला असल्याने त्यांचा अर्ज ग्राह्य ठरवण्यात आला आहे, तर नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जातील भाजपच्या माधुरी सागर नेवसे, कॉंग्रेसचे सागर दत्तात्रय मळेकर, भाजपचे सागर दशरथ धोंडे आणि राष्ट्रवादीचे विलास यशवंत डाळ यांचे अर्ज अवैध ठरले आहेत.
दि. 27 जून ते दि. 2 जुलै या काळात उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून, अर्ज मागे घेण्यासाठी नाराजांची मनधरणी सर्वच राजकीय पक्षांचे नेत्यांना करावी लागणार आहे. दि. 3 जुलैला अंतिम उमेदवार यादी जाहिर होऊन निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)