भोर नगरपालिकेच्या उपनराध्यक्षपदी उमेश देशमुख

भोर- भोर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी उमेश देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गजानन दानवले यांनी उपनगराध्य पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर आज (शुक्रवारी) झालेल्या निवडणुकीत नगरसेवक उमेश कृष्णराव देशमुख यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा भोरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांनी उपनगराध्यपदि देशमुख यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर केले. यावेळी गराध्यक्षा तृप्ती किरवे, मावळते उपनगराध्यक्ष गजानन दानवले, नगरसेवक चंद्रकांत सागळे, तानाजी तारु, किसन वीर, देविदास गायकवाड, डॉ. ए. सी. बिराजदार, ऍड. जयश्री शिंदे, डॉ. विजयालक्ष्मी पाठक, मंजू कांबळे, राष्ट्रवादिच्या नगरसेविका राजश्री रावळ, मनिषा शिंदे, सुनिता बदक आदी उपस्थित होते. निवडीनंतर मुख्याधिकारी संजय केदार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी संजय आसवले व नवनिर्वाचीत उपनगराध्यक्ष उमेश देशमुख यांचा प्रशासनाच्या वतीने सत्कार केला. तसेच आमदार संग्राम थोपटे यांनी उमेश देशमुख यांना निवडीबद्दल शुभेच्छा देऊन सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)