भोर नगरपालिकेकडून विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप

भोर- भोर नगरपालिकेवर आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसची एकहाती सत्ता असून भोर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा निर्मला आवारे आणि उपनगराध्यक्ष सुमंत शेटे यांच्या पुढाकाराने भोर नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांनी भोर विधानसभा मतदार संघाचे आमदार संग्राम थोपटे यांच्या वाढदिवसा निमित्त भोर नगरपालिकेच्या शाळांतील 325 शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थ्यींनींना शालेय गणवेशाचे वाटप केले.
भोर नगरपालिकेच्या आमराई आळी येथील शाळा क्र.3 मध्ये आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्षा आवारे आणि उप नगराध्यक्ष शेटे व सर्व नगर सेवकांच्या उपस्थितीत विद्यार्थांना गणेवेश वाटप करुन आमदार संग्राम थोपटे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. दिवाळीतच नविन गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी गट नेते नगरसेवक सचिन हर्नसकर, गणेश पवार, चंद्रकांत मळेकर, समीर सागळे, अमित सागळे, वृषाली घोरपडे, आशा रोमण, आशा शिंदे, रुपाली कांबळे, अमृता बहिरट, पद्मिनी तारु, सोनम मोहिते, कु.स्नेहा पवार, भोर शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष जितेंद्र कंक, कॉंग्रेसच्या मिडीया सेलचे तौफिक आत्तार, समीर वर्पे, निलेश पालकर यांच्यासह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)